Wednesday, August 4, 2010

Highlights of P.P. Sadguru Shri Aniruddha Bapu's pravachan on Ramrajya

रामराज्य म्हणजे जसं राज्य रामाने अयोध्येत चालवले तसं राज्य. अयोध्येतले नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाज व्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा सामष्ठीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य आणि हे येणारच... १०८ टक्के.

हे रामराज्य पाच स्तरांवर प्रगटणार आहे.

१. पहिला स्तर आहे - वैयक्तिक स्तर अर्थात व्यक्तिगत स्तर. प्रपंच आणि आध्यात्म ह्या दोहोंमध्ये रामराज्य आलं पाहिजे। सगळ्यातले सगळे बेस्ट म्हणजे रामराज्य. वैयक्तिक स्तरावरसुद्धा प्रपंच बेस्ट, बेस्टस्ट झाला पाहिजे. अध्यात्मातसुद्धा आमचं बेस्ट, बेस्टस्ट झालं पाहिजे.

२. दुसरा स्तर आहे - आप्त स्तर. कौटुंबिक स्तरावर, सहकुटुंब सहपरिवार स्तरावर रामराज्य येणार। कौटुंबिक स्तरावर प्रपंच आणि आध्यात्म ह्या दोहोंमध्ये रामराज्य आलं पाहिजे.

३. तिसरा स्तर आहे - सामाजिक स्तर. सामाजिक स्तरावर दोन्ही अंगांनी, भौतिक आणि नैतिक, रामराज्य आलं पाहिजे।

४. चौथा स्तर आहे - धार्मिक स्तर. धार्मिक स्तरावरसुद्धा रामराज्य दोन अंगांनी प्रगटणार आहे। प्रथम स्तर आहे धार्मिक शिक्षण. धार्मिक शिक्षण म्हणजे स्वतःच्या उन्नतीचे, अभ्युदयाचे शास्त्र. पवित्र मार्गाने स्वतःचा विकास कसा करायचा - ह्याचे शास्त्र म्हणजेच स्पिरितुअल म्हणजेच धार्मिक शास्त्र. दुसरा स्तर म्हणजे सामुहिक आणि वैयक्तिक धार्मिक आचरण.

५. पाचवा स्तर आहे - भारतवर्ष आणि जागतिक स्तर. भारतवर्षामध्ये आधी रामराज्य येणार आणि मग जागतिक स्तरावर.

क्रमशः