दैनंदिन करावयाच्या गोष्टी
१. ५ - ६ कढीपत्त्याची पाने (सांबर, आमटी, किंवा कढीपत्त्याच्या चटणी मधून) दररोज खाणे. अस केल्याने एका वर्षात शरीरामध्ये अशी रसायने निर्माण होतात कि ज्याने ५० - ८०% कॅन्सर पासून प्रतिबंध होतो
२. सूर्य प्रकाशात दररोज कमीत कमी अर्धा तास चालणे (दुपारी १ ते ३ ची प्रखर उन्हाची वेळ सोडून)
३. जेवणात फळांचा समावेश करणे
४. ३ - ४ लिटर पाणी दररोज पिणे
५. अध्यात्मिक गोष्टी:
अ. आन्हीक चे २ वेळा पठण
ब. गुरुक्षेत्रम मंत्राचे जमल तेवढ्या वेळा पठण
क. श्रीमद पुरुषार्थाचे कमीत कमी एक पान दररोज वाचणे
ड. संध्याकाळी घरी सगळ्यांनी मिळून ३ वेळा हनुमान चालीसाचे पठण
६. घरामध्ये तुळस, गुलाब, मोगरा, कढीपत्ता, झिपरी हि रोपे लावावी. ह्या मूळे घरातील प्राणवायूचे प्रमाण वाढतं
दर वर्षी करावयाच्या गोष्टी
१. पुरुषांसाठी, श्रावण सोमवारी सूर्यास्तानंतर, "श्री रणचंडिका प्रपत्ती". अधिक माहिती साठी इथे पहा
२. महिलांसाठी, मकर संक्रांतिच्या दिवशी, "श्री मंगलचंडिका प्रपत्ती"