Thursday, April 9, 2009

Hanuman Jayanti, Thursday, 09/04/2009: excerpts from P.P. Bapu's Discourse

प. पू. बापूंनी ०९/०४/२००९ गुरूवारच्या प्रवाचानत हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) बद्दल ही माहिती सांगितली.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी

  • हनुमंतानी लंकेत प्रवेश केला
  • हनुमंताने जानकीचा प्रथमच चरण स्पर्ष केला
  • जनाकिने पुत्र म्हणुन हनुमंताचा स्वीकार केला आणि तात म्हणुन सुद्धा स्वीकार केला
  • ह्याच दिवशी हनुमंताने जानकीच्या शोकाचे हरण केले
  • रावणाला भेटून त्यास उपदेश केला
  • शेवटी लंका दहन पण ह्याच दिवशी केली

अशा प्रकारे हनुमंतानी अशुभ कार्याचा नाश करण्यास सुरवात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केली, म्हणुन हा शुभ दिवस खर्या आर्थाने हनुमंताचा जन्म दिवस आहे. वाल्मीकि रामायणात सांगितल्याप्रमाणे हनुमंतानी ज्या दिवशी अन्जनिमातेचा पोटी जन्म घेतला त्या दिवशी सूर्य ग्रहण होते. सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशीच असते. म्हणुन चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमंताचा आन्जनिमातेच्या पोटचा जन्म दिवस नसून त्याचा कार्याचा जन्म दिवस आहे, लंकेत प्रवेशाचा दिवस आहे, लंका दहनाचा दिवस आहे. अशुभ कार्याच्या नाशाच्या सुरवातीचा दिवस आहे.

ह्या शुभ दिवशी म्हणुन हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, सुन्दरकाण्ड पठाण करणे लाभदायक आहे. असे केल्याने जानकीमाता शोक हरण करते. अशा पवित्र, सुन्दर दिवशी अनिरुद्ध गुरुक्षेत्रमला जाणे आधिक महत्वाचे आहे.

रामदूत हनुमान तेरा संकटमोचन नाम। सीताशोक विनाशी तुझको कोटि कोटि प्रणाम।।

हनुमन चालीस ३ वेळा म्हटली गेली.

Detailed Discourses are posted in English, Hindi and Marathi at http://www.manasamarthyadata.com/ (with some time lag). The discourses are also emailed to the Manasamarthyadata Yahoo Group http://groups.yahoo.com/group/Manasamarthyadata/. To subscribe to this group send an email to Membership@manasamarthyadata.com

No comments:

Post a Comment